नागपूरमध्ये दहावीच्या परीक्षेदरम्यान मुख्याध्यापक-शिक्षकामध्ये मारामारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपुरातील किदवई हायस्कूल ऍण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये शुक्रवारी दहावीचा पेपर सुरू असताना मुख्याध्यापक कक्षात सगीर अहमद आणि माजीद खान पठाण यांच्यात  वाद आणि हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये मराठीचे शिक्षक सगीर अहमद यांच्या डोक्याला मार लागल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

उपस्थिती नोंदविण्याच्या मुद्दय़ावरून हा वाद निर्माण झाल्याचे सांगितले जाते. सगीर अहमद यांनी मुख्याध्यापक आणि एका अन्य शिक्षकाने मिळून आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या बंधूंसह काही सहकाऱयांनीही शाळा प्रशासनावर गंभीर आरोप करत निषेध व्यक्त केला.

दुसरीकडे, मुख्याध्यापकांनी घटनेबाबत वेगळी माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, सगीर अहमद यांना दुसऱया परीक्षा केंद्रावर नेमण्यात आले होते. मात्र ते त्या केंद्रावर न जाता शाळेत आले आणि मस्टरवर स्वाक्षरी करण्याचा प्रयत्न केला. नियमानुसार त्यांना थांबवण्यात आले असता त्यांनीच वाद निर्माण केला.