घराबाहेर बसण्यावरून भोसरीत दोन कुटुंबात हाणामारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घराबाहेर बसण्याच्या कारणावरून भोसरीत झालेल्या वादामुळे दोन कुटुंबामध्ये जोरदार हाणामारी झाली. हा प्रकार भोसरीतील शांतीनगर येथे घडला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. रंगनाथ गोविंद पवार (वय 42) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फैय्याज सत्तार अन्सारी (वय 31), मुस्तफा सत्तार अन्सारी (वय 38), इजहार सत्तार अन्सारी (वय 28) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर नुरजहा अन्सारी (वय 35) हिच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फैय्याज अन्सारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रंगनाथ गोविंद पवार (वय 42), रामदास गोविंद पवार (वय 50), सचिन रामदास पवार (वय 28) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर संगिता रंगनाथ पवार (वय 35) हिच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार एम. एम. सावर्डे यांनी याबाबत माहिती दिली. पवार आणि अन्सारी कुटुंबिय शेजारी-शेजारी राहतात. बुधवारी सायंकाळी रंगनाथ यांचा पुतण्या सुनील आणि फैय्याज घराबाहेर बसले होते. यावेळी बाहेर बसल्यावरून त्यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यावसान दोन्ही कुटुंबाच्या हाणामारीत झाले. एकमेकांना बांबू, दगड आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. यात संगिता आणि नुरजहा जखमी झाल्या. याप्रकरणी भोसरी पोलीस तपास करत आहेत.