नागरिकांनो लक्ष द्या, आजपासून देशभरात लागू होताहेत हे महत्त्वाचे नियम

आजपासून म्हणजे (1 जुलै) संपूर्ण देशभरात अनेक मोठे बदल झाले आहेत. या बदलांचा महत्त्वाचा परिणाम हा थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. मुख्य म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक बाबींवर या बदलांचा परिणाम हा मुख्यत्वे होणार आहे. म्हणूनच सध्या याच नव्या नियमांची चर्चा सुरु झालेली आहे. यामध्ये आधार-पॅन लिंकिंग, रेल्वे तिकीट बुकिंग, क्रेडिट कार्ड नियम आणि बँक शुल्कापर्यंत सर्वत्र नवीन नियमांची एकच चर्चा आता सुरु झालेली आहे.

आजपासून आरबीआयने आता क्रेडिट कार्डबाबत एक नवा नियम लागू केलाय. 1 जुलैपासून सर्व खाजगी आणि सरकारी बँकांचे काही महत्त्वाचे नियम हे बदलले असून, आता सर्व क्रेडिट कार्डधारकांनाही काही नवे नियम लागू होणार आहेत. या नव्या नियमांतर्गत क्रेडिट कार्ड धारकांना भारत बिल पेमेंट सिस्टमद्वारे पेमेंट करावे लागणार आहे. तसेच यानंतर बिलडेस्क, इन्फिबीम अव्हेन्यू, क्रेडिट आणि फोनपे सारख्या प्लॅटफॉर्मवर मोठा परिणाम होणार आहे.

रेल्वे सुटण्याआधी केवळ चार तास आधी आरक्षण चार्ट जारी केला जायचा. परंतु आता मात्र भारतीय रेल्वेने हा नियम बदलला आहे. 1 जुलैपासून आरक्षण चार्ट आठ तास आधी तयार केला जाणार आहे.

GSTN म्हणजेच जीएसटी नेटवर्कने जाहीर केल्यानुसार आता GSTR-3B फॉर्म एडिट करता येणार नाही. तसेच आता करदाता तीन वर्षांनंतर मागील तारखेचा GST रिटर्न भरू शकणार नाही.

(आयटीआर) भरण्याची शेवटची तारीख 31 जुलैवरून आता मात्र वाढवण्यात आलेली आहे. ही तारीख आता 15 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. यामुळे आता नोकरदारांना 46 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळणार आहे. परंतु ITR फायलिंगसाठी मात्र कागदपत्रे तयार असतील तर, तुम्ही लवकर रिटर्न भरू शकता. यामुळे आयत्यावेळी होणाऱ्या तांत्रिक अडचणी टाळता येतील.

तुम्हाला नवीन पॅन कार्ड हवे असल्यास, आता आधार कार्ड हे अनिवार्य असणार आहे. याआधी पॅन कार्डसाठी जन्माचा दाखला लागत नव्हता. केवळ इतकेच नाही तर, म्हणूनच आता सीबीडीटी कडून आधार पडताळणी ही अनिवार्य करण्यात आली आहे.

आनंदाची बाब म्हणजे आता ​व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाला आहे. IOCL च्या माहितीनुसार 19 किलोचा सिलिंडर आता तब्बल 58 ​रुपयांनी स्वस्त झाला आहे. सलग चौथ्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीमध्ये झालेली ही कपात अनेक व्यावसायिकांसाठी दिलासादायक बाब आहे.

UPI चार्जबॅकसाठी देखील आता नवीन नियम लागू करण्यात आला आहे. नाकारलेल्या चार्जबॅक क्लेमची प्रक्रिया करण्यासाठी बँकांना NPCI ची मान्यता लागत असे. पण आता मात्र बँका NPCI च्या मंजुरीशिवाय चार्जबॅक क्लेमची पुन्हा प्रक्रिया पूर्ण करु शकणार आहेत.

आता नवीन नियमांनुसार, तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी आधार अनावश्यक असणार आहे. त्याचबरोबर 15 जुलैपासून तिकीट बुकिंगसाठी (ऑनलाइन किंवा ऑफलाइन) द्वि-घटक प्रमाणीकरण लागू केले जाणार आहे. यात नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. तसेच रेल्वे तिकिटांच्या किमतीत आता थोडी वाढ होणार आहे. नॉन-एसी कोचसाठी प्रति किलोमीटर 1 पैसे आणि AC कोचसाठी प्रति किलोमीटर 2 पैसे वाढ होईल.