
बँकिंग नियमांचे पालन न करणाऱ्या तीन बँकांना आरबीआयने दंड ठोठावला आहे. या बँकांमध्ये युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकाचा समावेश आहे. तसेच फिनटेक कंपनी पाइन लॅब्सवरही आरबीआयने कारवाई केली आहे. यूनियन बँक इंडियावर 95.40 लाख रुपये, सेंट्रल बँक ऑफ इंडियावर 63.60 लाख रुपये, बँक ऑफ इंडियावर 58.50 लाख रुपये आणि पाइन लॅब्सवर 2.10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यूनियन बँकेने 24 तास तक्रार सुविधा उपलब्ध केली नाही तर सेंट्रल बँकेने केवायसी नियमांमध्ये उल्लंघन केल्याचा आरोप आहे. बँक ऑफ इंडियाने खात्यातून अतिरिक्त शुल्क वसूल केल्याने दंड ठोठावला आहे.






























































