पाणी सोडण्याच्या कारणावरुन चाकूने वार, एक जण जखमी

822

रेणापूर तालूक्यातील मौजे कामखेडा येथे पाणी सोडण्याच्या कारणावरुन चाकूने वार करुन जखमी केल्याची  घटना घडली. या प्रकरणी आरोपी विरुध्द रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामखेडा येथे ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा सेवक तांबोळी अखील अलिसाब हा सोमवारी सायंकाळी नळाला पाणी सोडत होता. तेव्हा गावातील शिवाजी कासले या व्यक्ती आला. कासले याने ग्रामपंचायत सेवकाला आमच्या भागात पाणी का सोडत नाही असा प्रश्न विचारला. तसेच कासले याने तांबोळी याला शिवीगाळ केली. नंतर कासले याने तांबोळीवर चाकूने वार केले आणि तिथून फरार झाला. तांबोळीला जवळच्या इस्पितळात दाखल केले असून कासलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या