
उत्तर प्रदेशात टाकून दिलेल्या अवस्थेत आढळलेल्या अनाथ मुलीचे बरेलीतील अनाथाश्रमाने धर्मांतर केल्याविरुद्ध उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी एफआयआर दाखल केला आहे. माल्टा येथील परदेशी जोडप्याने सीताला दत्तक घेतले होते. त्यांच्यावर चुकीचे धर्मांतर केल्याचा आरोप आहे.
अंशू कुमार यांनी आरोप केला आहे की अनाथाश्रमाचे कर्मचाऱ्यांनी बाळाचे ओळख बदलून तिला नवीन ख्रिश्चन नाव असलेले आधार कार्ड बनवल्याचा आरोप केला आहे. आपल्यावरील आरोप फेटाळत अनाथाश्रमाचे व्यवस्थापक प्रिमरोज एडमंड यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, “केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाद्वारे बाल न्याय कायदा, 2015च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आणि सर्व नियमांनुसार दत्तक घेण्यात आले. यात माझी कोणतीही थेट भूमिका नाही. बाळाचे नाव अजूनही ‘सीता’ आहे आणि माल्टा येथील तिचे नवीन पालक तिला याच नावाने हाक मारतात.”
आठवड्याभरापूर्वी ती माल्टाला जाणार होती. याप्रकरणी शनिवारी आयपीएस सेक्शन 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस स्टेशन 468 कलम दाखल केले आहे. बरेली-स्थित कार्यकर्ते अंशू कुमार यांच्या तक्रारीवरून अनाथाश्रमाचे अधिकारी, सीतेचे दत्तक पालक आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध कायदा, 2021 एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
अनाथाश्रमच्या कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटिनुसार स्थानिक राजकीय नेत्याला सीताला दत्तक घ्यायचे होते. पण ते घेऊ न शकल्याने आता ते अडथळा आणत असल्याचे सांगितले. मुलीचे नाव बदलले नाही. तिचे नाव रेकॉर्डवर मॅन्युएला सीता कॅमिलेरी असं असून कॅमिलेरी हे तिच्या नवीन आई-बाबांचे आडनाव आहे. तर मॅन्यएला हे तिच्या नवीन वडिलांचे नाव आहे. तर अन्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सीता ‘विशेष गरजा’ श्रेणीत येते कारण तिला जप्ती विकाराने ग्रासले होते. तिला वर्षभरात तिनवेळा श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला दत्तक घेण्याच्या प्रक्रियेत उशीर झाल्यामुळे तिच्या जीवाला धोका आहे.
याप्रकरणी बरेलीचे पोलीस अधिक्षक राहुल भाटी यांनी सांगितले की, “अनाथाश्रमात राहणाऱ्या मुलांचा धर्म बदलत असल्याच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आला होता आणि सीतेचे उदाहरण असेच एक प्रकरण म्हणून देण्यात आले होते. याप्रकरणी तपासणी सुरु आहे”



























































