नीतेश राणेंवर कारवाई करा! शिवसेनेची पोलीस ठाण्यांत तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पुरातन दर्ग्याच्या नावावरून धार्मिक तेढ निर्माण करणाऱया नीतेश राणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, अशी जोरदार मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत शिवसेनेच्या वतीने मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात हजरत पीरबाबा हा पुरातन छोटा दर्गा आहे. या दर्ग्याजवळ हजरत पीरबाबा दर्गा असा नामफलक आहे. हा नामफलक एका ट्विटर अकाऊंटवरून सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर भाजप आमदार नीतेश राणे यांनी शिवसेनेवर नाहक टीका केली आहे. शिवसेनेने रातोरात उद्यानाचे नाव बदलल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. नीतेश राणे यांच्या हा आरोप म्हणजे अपुऱया माहितीच्या आधारे आणि केवळ राजकारणासाठी केलेली स्टंटबाजी असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्हटले आहे.