आता चालत्या ट्रेनमध्येही चोरीचा ‘एफआयआर’ दाखल करणे शक्य!

277

मेल-एक्प्रेसने प्रवास करणाऱया कोटय़वधी प्रवाशांच्या सोयी-सुविधेसाठी केंद्र सरकारने नवीन मोबाईल ऍप लाँच केले आहे. या मोबाईल ऍपमुळे चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना ‘एफआयआर’ दाखल करणे शक्य होणार आहे. रेल्वे प्रवासात पैसे किंवा मौल्यवान वस्तू चोरीला गेल्यास या ऍपमुळे चालत्या गाडीत चोरीची ऑनलाइन तक्रार करता येणार आहे.

ट्रेनचा वेग कमी असल्याचा फायदा उठवत आरोपी चालत्या गाडीतून उतरून पळून जात असतात. अशावेळी प्रवासी सुरक्षा साखळी ओढून ट्रेन थांबवितात. तोपर्यंत चोरटे दूरपर्यंत पसार झालेले असतात. रेल्वे स्थानकावर उतरून तक्रार दाखल करणे तर त्यापेक्षा अधिक कठीण असते. अशा पोलीस हद्दीचा मुद्दा उपस्थित करीत या पोलीस ठाण्यातून त्या पोलीस ठाण्यात प्रवाशांना पळवीत असतात. लोहमार्ग पोलिसांनी यावर तोडगा काढला असून ‘सहयात्री’ नावाचे मोबाईल ऍप 10 ऑक्टोबरपासून सुरू केले आहे.

‘एफआयआर’ दाखल करण्यासाठी दोन तास ट्रेन थांबविली!
हे ऍप लाँच करण्याला एक पार्श्वभूमी आहे. शान-ए-पंजाब एक्प्रेसमध्ये अशाप्रकारे चोरीची घटना घडली होती. त्यावेळी ट्रेनने नवी दिल्ली स्थानक सोडताच प्रवाशांनी सुरक्षा साखळी खेचून ट्रेन थांबविली. आधी चोरीची ‘एफआयआर’ दाखल करावी नंतरच ट्रेन सोडावी असे प्रवाशांचे म्हणणे होते. अनेक वेळा ट्रेन सुरू करण्याचे प्रयत्न प्रवासी सुरक्षा साखळी वारंवार खेचत असल्याने व्यर्थ गेले होते. त्यामुळे दोन तासांच्या विलंबानंतर ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

आपली प्रतिक्रिया द्या