ओव्हरहेड वायरवर बॅग फेकल्याने लोकलला आग, रेल्वेसेवा प्रभावित

हार्बर मार्गावरील वाशी स्थानकात अज्ञात व्यक्तीने लोकलवरील ओव्हरहेड वायरवर बॅग फेकली. त्यामुळे ओव्हरहेड वायरला आग लागली.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी 9.28 मिनिटांची गाडी वाशीवर थांबली होती. तेव्हा एका अज्ञात व्यक्तीने पेंटाग्राफवर बॅग फेकली. त्यामुळे वायरला आग लागली. घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडने घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण गाडी रिकामीकयात आली. य़ावेळी प्रवाशांची वर्दळ नसते त्यामुळे मोठा अपघात झाला नाही.

या दुर्घटनेमुळे रेल्वेसेवेवर परिणाम झाला. अनेकांनी बस पकडून आपला मार्ग धरला. तर काहींना दुसर्‍या लोकलने जाणेच पसंत केले.

आपली प्रतिक्रिया द्या