
मुंबईत विधानभवनाच्या प्रवेशदाराजवळ भीषण आग लागली आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. प्रवेशदाराजवळ एका इलेक्ट्रिक बोर्डात शॉक सर्किटमुळे ही आग लागली. या आगीमुळे धुराचे लोट परिसरता पसरले होते. धुराचे लाट पाहता अग्निशमन दलाने लगेच धाव घेतली आणि ही आग विझवण्याचे प्रयत्न केले. आग लागल्यानंतर हा भाग तातडीने निर्मनुष्य करण्यात आला आहे.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, विधानभवनाच्या स्कॅनिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढल्याचे नार्वेकरांनी सांगितले.


































































