उज्जैनच्या महाकाल मंदिरात आग

उज्जैन येथील बाबा महाकालेश्वर मंदिरात आज भीषण आग लागली. आवारात असलेल्या नियंत्रण कक्षाच्या छताला आग लागल्याने मंदिर परिसरात भाविक आणि मंदिर प्रशासनाची एकच धावपळ उडाली. आगीत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वायू गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणेच्या बॅटऱया जळून खाक झाल्या. आगीच्या ज्वाळा 1 किलोमीटर अंतरावरून दिसत होत्या.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी पोहोचल्या आणि शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.