सूरतमध्ये इमारतीला भीषण आग

236

गुजरातमधील सूरत या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरातील एका इमारतीला आग लागली आहे. रघुवीर सेलियम मार्केट असं या इमारतीचं नाव असून या इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागली आहे.

आगीचा भडका तीव्र असल्याने अग्निशमन दलाच्या 40 गाड्या घटनास्थळ दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या