ताजमहालच्या दक्षिणी प्रवेशद्वाराजवळ लागली आग, कारण आले समोर

रविवारी सकाळी आग्रा येथील ऐतिहासिक ताजमहालमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. ताजमहालच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वाराजवळ आग लागली, ज्यामुळे धुराचे लोट आणि घबराट पसरली.  आग त्वरित आटोक्यात आणण्यात आली आणि कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.

मिळालेल्या माहितीनुसरा, ही आग शॉर्ट सर्किट झाल्याने लागल्याची समजते. धूर येताच, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब टोरेंट पॉवर कंपनीला कळवले. त्यानंतर वीजपुरवठा त्वरित खंडित करण्यात आला. त्याानंतर तेथे दुरुस्तीचे काम सुरू केले.

ताजमहालच्या दक्षिण गेटमधून पर्यटकांसाठी प्रवेश 2018 पासून बंद आहे, त्यामुळे आगीच्या वेळी गर्दी नव्हती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि एएसआय पथके घटनास्थळी पोहोचली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल झाला.