इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीत तांत्रिक दोष असल्याने आगी, केंद्राच्या चौकशी समितीचा निष्कर्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाजारातून मागे घेण्यात आल्या होत्या. आता केंद्र सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमध्ये तांत्रिक दोष असल्याने आगीच्या घटना घडत असल्याचे म्हटले आहे.

एकीकडे ई-वाहनांची लोकप्रियता वाढत असतानाच ई-वाहनांना वारंवार आग लागण्याच्या आणि बॅटरीमध्ये स्फोट होण्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांत घडल्या आहेत. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कंपन्यांनी ही वाहने माघारी घेत दोष दूर करण्याचे आदेश दिले होते. याचबरोबर या आगी लागण्यामागे नक्की काय कारण आहे याचा शोध घेतला जात होता. केंद्र सरकारने याचा तपास करण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीने आता अहवाल सादर केला असून या बॅटरीमध्ये दोष असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काय आहे कारण?

इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीच्या सदोष सेलमुळे आगीच्या घटना घडत असल्याचे केंद्राने स्थापन केलेल्या चौकशी समितीला आढळून आले आहे. केंद्र सरकार या वाहनांच्या उत्पादकांवर बॅटरीचा दर्जा सुधारण्यासाठी दबाव आणू शकते. चौकशी समितीला देशातील जवळपास सर्वच इलेक्ट्रिक दुचाकी आगीच्या घटनांमध्ये बॅटरी सेल किंवा डिझाईनमध्ये दोष आढळला आहे. ओकिनावा ऑटोटेक, बूम मोटर, प्युअर ईव्ही, जितेंद्र ईव्ही आणि ओला इलेक्ट्रिक यांच्या ई-स्कूटर्समधील ईव्ही आग आणि बॅटरी स्फोटाच्या घटना लक्षात घेऊन ही समिती नेमली होती. ई-वाहन क्षेत्रातील तज्ञ्ज आता त्यांच्या वाहनांशी संबंधित बॅटरी समस्या सोडवण्यासाठी ईव्ही उत्पादकांशी संपर्क साधतील आणि उपाय सुचवतील.

बॅटरीत स्फोटाच्या अनेक घटना

तेलंगणातील निजामाबाद जिह्यात अलीकडेच एका ई-स्कूटरचा स्फोट होऊन एका 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले होते. अशीच दुसरी घटना आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे घडली. येथे एका तरुणाचा मृत्यू झाला होता. नुकतीच परळी येथे एका व्यक्तीने कंटाळून त्याची इलेक्ट्रिक स्कूटर गाढवाला बांधून तिची मिरवणूक काढली होती. आतापर्यंत सुमारे 25 ई-स्कूटरमध्ये आग किंवा स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या वाहनांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.