ब्रीच कॅण्डी  अपार्टमेंटमध्ये आग; महिनाभरात दुसरी घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भुलाभाई देसाई रोड येथील ब्रीच कॅण्डी अपार्टमेंटमध्ये अकराव्या मजल्यावर आज दुपारी आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने ही आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, गेल्या महिनाभरात या अपार्टमेंटमध्ये आगीची दुसरी घटना आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अपार्टमेंटला पालिकेच्या अग्निशमन दलाकडून नोटीस बजावली जाणार आहे. भुलाभाई देसाई रोडवरील ब्रीच कॅण्डी अपार्टमेंटमध्ये दुपारी 4.33 वाजताच्या सुमारास 11 व्या मजल्यावर आगीचा भडका उडाला. 7.22 वाजता ही आग पूर्ण नियंत्रणात आली.