
सामना प्रतिनिधी । भोकरदन
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील क्षीरसागर येथे एका गोठ्याच्या छपराला लागलेल्या आगीत होरपळून तीन चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संजीवनी गजानन मवहारे (वय 4), वेदांत विष्णू मवहारे (वय 7), सार्थक मारुती कोलते (वय 5) या तीन मुलांचा आगीत भाजून मृत्यू झाला आहे. ही घटना सकाळी 11 वाजे दरम्यांन , घडली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, क्षीरसागर गावालगतच विष्णू कोलते यांचा पत्रे व चारी बाजूने तुरहाटी व परहाठीने त्यास कुड घातलेला गोठा आहे. यातच जनावरांसाठी चारा ही साठवून ठेवलेला होता. त्यास आग लागली त्यावेळी ही मुले तेथे खेळत होती. तिघेही गोठ्यात होते पेटलेल्या चाऱ्या बरोबरच गोठा ही पेटला वाऱ्यामुळे आग जास्त भडकली त्यात तिन्ही मुलांचा होरपळून मृत्यू झाला. आगीची घटना कळताच ग्रामस्थ धावून आले. गावातून खासगी टँकर बोलावून आग विझवण्यात आली मात्र तोपर्यंत मुले गंभीर जखमी झाली होती. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांचे मृतदेह भोकरदनच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथे त्यांचे शव विच्छेदन सुरू आहे. या घटनेमुळे तिन्ही मुलांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.






























































