शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत दोन लाखांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । औसा

औसा तालुक्यातील टाका येथील शेतकरी अप्पाराव भानुदास शिंदे यांच्या शेतामध्ये रविवारी दुपारी सॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत त्यांचे दोन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीमध्ये शेतामधील जवळपास दोन एकर ऊस, संपूर्ण ठिंबक सिंचन नळ्या व शेतामध्ये काढून ठेवलेली ज्वारीची कणसे, सुमारे दोन एकरमधील ज्वारी जळून खाक झाली आहे. त्या ज्वारीची मळणी केली असती तर त्यापासून जवळपास 20-25 कट्टे ज्वारीचे उत्पादन अपेक्षित होते. तसेच शेतामध्ये असणारी चार नारळांची झाडे, पाईपचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शिंदे यांच्यापुढे उदरविर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. या आगीची नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे.