कुणकेश्वर बाजारपेठेत एका दुकानाला आग; दोन लाखांचा मुद्देमाल जळून भस्मसात

देवगड कुणकेश्वर बाजारपेठेत एका दुकानाला आग लागल्याने दुकानातील मुद्देमाल जळून भस्मसात झाला आहे. बाजारपेठेतील अरुण पेडणेकर यांच्या दुकानाला आग लागून त्यांचे सुमारे दोन लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. गुरुवारी पहाटे त्यांच्या दुकानाला अचानक आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच या घटनेची माहिती तहसील कार्यालयात देण्यात आली आहे.

या आगीत दुकानातील कॅमेरा, स्टुडिओ लाईट, इलेक्ट्रिक काटा, प्लास्टिकचे ट्रे, लाकडी कपाट तसेच भाजीपाला आदी वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडल्याने पेडणेकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कोरोना महामारीमुळे व्यवसायात आलेली मंदीतून बाहेर पडत असताना त्यांचे दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने पेडणेकर यांचे मोठे नुकसान झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या