
सामना प्रतिनिधी । देवरुख
देवरुख मधील जि.प.देवरुख शाळा नं.2 मधील वर्गखोलीला बुधवारी दुपारी 3 वाजता शार्ट सक्रीटने आग लागली. या आगीत लाखो रुपयांची हानी झाली आहे. याच शाळेच्या मैदानावर बीट स्तरावरच्या शालेय क्रीडा स्पर्धा सकाळपासुन सुरू होत्या. यातील दोन मुलांना शाळेच्या खोलीतून धूर येताना दिसला व त्यांनी आरडा ओरडा केल्याने शिक्षक बांधवांनी धावपळ करुन आग विझवली.
या आगीत शाळेची चाळीस बेंचेस, क्रीडासाहित्य, भांडी, टिव्ही, शोकेस, ग्रथालयातील पुस्तके, विज्ञान पेटी, गणित पेटी, शिलाई मशिन, वॉटर प्युरीफायर, वर्गखोलीचे सर्व वायरींग जळुन खाक झाले. पंचायत समिती शिक्षण विभाग,नगरपंचायत,महावितरण,पोलीस आदींनी शाळा नं.2 ला भेट देऊन पंचनामा केला.


































































