पोलीस अधिक्षक मिटींग हॉलला आग, लाखोंचे फर्निचर जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयातील पहिल्या मजल्यावर असलेल्या मिटींग हॉलला शनिवारी मध्य रात्री 2.30 च्या सुमारास मोठी आग लागली. या आगीमध्ये मिटींग हॉलमधील फर्निचरचे मोठे नुकसान झाले.

ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयात पहिल्या मजल्यावर मिटींग हॉल आहे. या मिटींग हॉलमध्ये अधिक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या मिटींग, सेमिनार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका या हॉलमध्ये होतात. रविवारी रात्री अचानक आग लागली. ही बाब खिडकीतून निघणाऱ्या धुरामुळे काही कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ सिडको अग्निशमन विभागाला कळविले असता अग्निशमन विभागाचे अधिकारी एस.के. भगत जवान वैभव बाकडे सोमीनाथ भोसले, अशोक वेलदोडे, वाहन चालक बबन मावले कंत्राटी कर्मचारी अजिक्य भगत दिनेश वेलदोडे अधिनाथ बकले, अब्दुल माजेद आदींनी घटनास्थळी धाव घेऊन अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. मात्र तो पर्यंत मिटींग हॉलमधील लाखो रुपयांचे फर्निचरचे मोठे नुकसान झाले.