
पुणे शहरातील वैदुवाडी जवळील सुरक्षानगर मध्ये रविवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत 12 पत्र्याच्या झोपड्या खाक झाल्या. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासात आग पूर्णपणे विझवली.
अग्निशमक दलाला पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास वैदुवाडी येथील सुरक्षानगरमधील झोपड्यांना आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाची जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यास सुरूवात केली. पोलीस आणि अग्निशमन जवानांनी स्थानिकांना सुरळितस्थळी हलवून आगीवर नियंत्रण मिळविले. परिसरात राहणारे रिक्षाचालक, ड्रायव्हर, सेंट्रिगचे काम करणाऱ्यांसह गरिबांची घरे आगीच्या भक्यस्थानी पडली आहेत.
सुदैवाने कोणतीही जिवीतहानी अथवा कोणी जखमी झाले नाही. दोन अग्निशमन गाड्यांसह एक पाण्याच्या टँकरच्या मदतीने आग विझविण्यात आली. हडपसर अग्निशमन दलाचे जवान दत्तात्रय वाघ, सोमनाथ मोटे, संजय जाधव, विलास दडस, सत्यम चौखंडे, प्रदिप कोकरे यांनी आग विझवली.




























































