वसईच्या धुमाळनगर परिसरात आग; जिवीतहानी नाही

340

वसई पूर्वेतील धुमाळनगर परिसरातील फर्नीचर मार्केटमधील एका लाकडी फर्नीचरच्या दुकानाला पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत लाकडी फर्नीचरच्या दुकानाने पेट घेतला आणि आजूबाजूला असलेली सात ते आठ दुकाने आगीत भस्मसात झाली. वसई विरार महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत चार गाड्या आणि 25 पाण्याच्या टँकरने आग आटोक्यात आणली. ही आग शॉर्टसर्कीटने लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. फर्नीचरच्या दुकानात मोठ्या प्रमाणात प्लायवुड असल्याने आगीने लगेचच रौद्ररुप धारण केले. या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. याबाबत अधिक तपास वालिव पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या