
वड़वणी येथील वसंतराव नाईक चौकात असलेले विजय राजेभाऊ मायकर यांच्या बालाजी इलेक्ट्रीकल्स व फर्नीचरला सोमवारी सायंकाळी भीषण आग लागली. यात 50 लाख रूपयांचे नुकसान झाले.
वडवणी येथील विजय मायकर यांच्या वसंतराव नाईक चौकातील बालाजी इलेक्ट्रीकल आणि फर्नीचर दुकानाला सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत 50 फ्रीज, वॉशिंग मशीन, एलईड़ी, कुलर, कपाट, सौफा, दिवाणसह अनेक मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या. या आगीत 50 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. माजलगाव साखर कारखान्याची अग्निशमन दलाची गाड़ी तात्काळ आल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीचा फटका लखन सिलेक्शनला हा बसला असून माजलगाव नगर पालिका व बीड़ येथून उशिरा अग्निशमन दलाची गाड़ी आली. रात्री उशिरापर्यंत आग घुमसत होती.





























































