गडचिरोलीत मतदान संपवून परतणाऱ्या जवानांवर गोळीबार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
naxal-attack
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । नागपूर

गडचिरोलीत मतदान संपल्यानंतर केंद्रांवरून परतणाऱ्या सीआरपीएफच्या जवानांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला आहे. गडचिरोलीतील धनोरा येथील तुम्रिकासा गावात 4 च्या सुमारास ही घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले.

तुम्रिकासा गावाजवळ असलेल्या 283 क्रमांकाच्या बूथवरील जवान मतदान आटोपल्यानंतर परत जात असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला हे जवान सीआरपीएफच्या 113 व्या बटालियनचे होते.