
या वर्षीचे पहिले चंद्रग्रहण जगभरात 15 आणि 16 मे अशा दोन दिवशी होत आहे. हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार 16 मे रोजी सकाळी 7.02 वाजता ग्रहण होईल आणि दुपारी 12.20 वाजता समाप्त होईल. मात्र चंद्रग्रहण हिंदुस्थानातून दिसणार नाही. यावेळी चंद्र अधिक लालसर रंगात दिसेल.
नासाच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या पूर्वेकडील अर्धा भाग आणि संपूर्ण दक्षिण अमेरिकेला चंद्रग्रहणाचा प्रत्येक टप्पा पाहण्याची संधी मिळेल. संपूर्ण आफ्रिका, पश्चिम युरोप, मध्य आणि दक्षिण अमेरिका आणि बहुतेक उत्तर अमेरिकेत दिसेल, असे अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ने सांगितले. दुसरे चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे.





























































