आज वर्षातील पहिले सूर्यग्रहण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

या वर्षातील पहिले सूर्यग्रहण उद्या 8 एप्रिल 2024 ला होणार आहे. तब्बल 54 वर्षांनंतर हे सूर्यग्रहण लागणार आहे. अंदाजे पाच तास 25 मिनिटे हे सूर्यग्रहण चालेल. दरम्यान, अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाच्या म्हणण्यानुसार 8 एप्रिल रोजी संपूर्ण सूर्यग्रहण साधारण 70 मिनिटे चालणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी हे सूर्यग्रहण सुरू होणार असून 9 एप्रिल रोजी रात्री दोन वाजेपर्यंत ते चालणार आहे. ग्रहणाची वेळ रात्रीची असल्याने भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाही.