…अन् 12व्या खेळाडूने केली फलंदाजी

क्रिकेटमध्ये बदली खेळाडूने क्षेत्ररक्षण केल्याचे आपण नेहमीच बघतो. मात्र, बदली खेळाडूने चक्क फलंदाजी करण्याची घटना ऍशेस मालिकेत रविवारी घडली अन् क्रिकेटच्या इतिहासाला आणखी एक पान जोडले गेले. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील दुसर्‍या कसोटीत शेकटच्या दिवशी जायबंदी झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथच्या जागी चक्क 12 वा खेळाडू मार्न्स लाबुशेन फलंदाजीसाठी आला. त्यामुळे क्रिकेटच्या इतिहासात 12 वा खेळाडू म्हणून फलंदाजी करणारा लाबुशेन हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

लॉर्डस् कसोटीच्या पहिल्या डाकात इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ मानेकर उसळता चेंडू लागून जखमी झाला. त्याकेळी स्मिथ 80 धावांवर खेळत होता. मात्र या वेदनेतून सावरत स्मिथने पुन्हा खेळपट्टीवर उतरून पुढे फलंदाजी केली. मात्र, दुसर्‍या दिवशी उठल्यावर स्मिथला त्रास होऊ लागल्याने पुढे खेळता आले नाही. म्हणून त्याच्या जागी 12वा खेळाडू असलेल्या मार्न्स लाबुशेनने फलंदाजी केली.

नुसताच खेळला नाही, तर कसोटीही ड्रॉ केली

1 ऑगस्टपासून ‘आयसीसी’ची नवी नियमावली लागू झाली आहे. बदललेल्या नियमानुसार जर एखादा खेळाडू सामन्यादरम्यान जखमी झाला, तर त्याच्याऐवजी बदली खेळाडूला उर्वरित लढतीत खेळण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. या नियमानुसार ऑस्ट्रेलियाने पाचव्या दिकशी सकाळी सामनाधिकारी रंजन मदुगले यांची भेट घेऊन स्मिथच्या जागी मार्न्स लाबुशेन याचा संघात समावेश करण्याचे पत्र दिले. त्यानंतर उर्वरित लढतीसाठी लाबुशेनचा संघात समावेश करण्यात आला. दरम्यान, फलंदाजीस आल्यावर लाबुशेन यालाही जोफ्रा आर्चरच्या उसळत्या चेंडूचा प्रसाद मिळाला. मात्र लाबुशेनने समर्थपणे फलंदाजी करत मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवला आणि 59 धावांची सुरेख खेळी. त्याने नुसतीच अर्धशतकी खेळी केली नाही, तर सामना ड्रॉ करण्यातही मोलाचा वाटा उचलला.

आपली प्रतिक्रिया द्या