
सामना ऑनलाईन, मुंबई
7 लाखांची चोरी करून पळालेल्या मच्छीविक्रेत्याला अखेर मेघवाडी पोलिसांनी अटक केली. मोफाजूल हक हसीमाउद्दीन शेख ऊर्फ अब्दुल असे त्याचे नाव आहे. जोगेश्वरी पूर्व परिसरात तक्रारदार महिलेचे मासे विक्रीचे दुकान आहे. त्यांना गावी घर बांधायचे होते. घर बांधण्याकरिता त्यांनी सोने गहाण ठेवून सात लाख आणले होते. गावी जायचे असल्यामुळे त्या पैसे दुकानात मोजत बसल्या होत्या. तेव्हा अब्दुल मासे खरेदी करण्याकरिता तेथे आला. अब्दुल परिचयाचा असल्याने तक्रारदाराने त्याला दुकानात थांबवून त्या अंडी आणायला गेल्या. काही वेळाने त्या दुकानात आल्या तेव्हा अब्दुल तसेच दुकानातील 7 लाख तेथे नव्हते.




























































