रत्नागिरी- दाभोळ खाडीच्या प्रदुषणाविरोधात मच्छिमार बांधव करणार उपोषण

लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाण्यामुळे दाभोळ खाडीत जलप्रदूषण होत आहे. गेली 30 वर्षे इतले मच्छिमार या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने त्यांनी 2 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. दर्यासारंग मच्छिमार भोईसमाज उत्कर्ष मंडळाने उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे. जलप्रदुषणामुळे खाडीतील मासे मृत होतायत, याचा फटका इथल्या छोट्या मच्छिमारांना बसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या