असे मासे खाल तर तडफडाल… रोगर टाकून मारलेले मासे नागरिकांच्या घशात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pond-fishing

सुंदर नाईकवाडे । केज

मासेमारीसाठी सोप्पा पर्याय म्हणून गुत्तेदाराकडून रोगर टाकून मासेमारी सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रोगरचा परिणाम होऊन विषबाधा झालेले मासे खाऊन कुणाला विषबाधा झाल्यास कोण जबाबदार असा सवाल विचारला जात आहे.

केज तालुक्यातील धनेगाव धरणातील शासकीय मासेमारी गुत्तेदार लक्ष्मण सोनवणे हे मासेमारीसाठी रोगर टाकून मासेमारी करत आहेत. यामुळे चार-पाच किलोमीटर हद्दीत रोगरचा परिणाम होऊन विषबाधा झालेले मासे तरंगत आहेत. तसेच हे विषबाधेमुळे मृत झालेले मासे वेचून विकले जात आहेत, अशी माहिती मिळते आहे.

मासे मारण्यासाठी घातक रोगरचा वापर केला जातं आहे. याने विषबाधा होऊन माणसे मेले तर याला जवाबदार कोण? असा सवाल विचारला जात आहे. तरी संबधित विभागाने या गुत्तेदाराच्या विरोधात प्रशासनाने कारवाई करून लक्ष्मण सोनवणे सोसायटीचा परवाना रद्द करावा अशी मागणी तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे यांनी केली आहे.

केज कळंब लातूर ला पाणी पिण्यासाठी उपलब्ध नाही. या धरणातील पाण्यामुळे राजकीय संघर्ष टोकाला आहे. पण धरणात रोगर टाकून मासेमारी केली जात आहे. त्यासाठी तीन जिल्हांच्या नेत्यांनी एक होऊन हा प्रकार बंद केला पाहिजे. नाहीतर उद्या मोठा अनर्थ होऊ शकतो. प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केज तालुका शिवसेनेने केली आहे.