पुण्यात आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसाला धक्काबुक्की, तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना कोथरूडमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वाल्हेकर विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस कर्मचारी काळे पौड रस्ता परिसरातील म्हातोबानगर परिसरात गेले. त्यावेळी वाल्हेकर, मोहोळ, शेख यांनी पोलीस कर्मचारी काळे यांना धक्काबुक्की, सरकारी कामात अडथळा आणणे तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी देवीदास वाल्हेकर, ज्ञानेश्वर मोहोळ आणि समीर शेख यांना अटक करण्यात आली आहेत. याबाबत पोलीस कर्मचारी महेश काळे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सहायक पोलीस निरीक्षक वृषाली पाटील तपास करत आहेत.