
जिद्द असेल तर जगात अशक्य असे काहीच नाही. करायचे ठरवले तर वयसुद्धा आडवे येत नाही. 55 वय असलेल्या एका महिलेने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. या वयात महिलेने सहा पॅक्स अॅब्स करून दाखवले आहेत. ही महिला फिटनेस ट्रेनर असून तिचे नाव अॅन बॅरंटे असे आहे. या वयातही तरुणांना लाजवतील असे अॅब्स करून दाखवले आहेत. 55 वर्षीय अॅन बॅरंटे क्लिनिकल सायंटिस्ट आणि पर्सनल ट्रेनर आहेत. ज्यांच्याकडे सहा पॅक अॅब्स आहेत. वर्कआऊटचा व्हिडीओसुद्धा बॅरंटे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ओव्हर 50 या हॅशटॅगखाली एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मॅम, मी 25 वर्षांचा आहे आणि तुम्ही पूर्वीपेक्षा चांगले दिसत आहात. मी तुमच्याकडून खूप प्रेरित आहे. मला अॅब्स बनवायचे आहेत, मी काय करू? एका व्यक्तीने व्हिडीओवर ट्रेनर बॅरंटे यांना विचारले.



























































