
बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीचा पर्दाफाश करत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 5 कोटी रुपयांचे सोने हस्तगत करण्यात आले आहे. आरोपींनी प्रायव्हेट पार्टमध्ये सोने लपवले होते. आरोंपीनी बांगलादेशमार्गे बंगळुरूत या मालाची तस्करी केल्याचे प्राथमिक तपासात म्हटले आहे.
एनटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. आरोपींकडून 5 कोटी रुपये किमतीच्या सोन्याच्या कॅप्सूल आणि बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी सोने कॅप्सूल आणि पेस्टच्या स्वरूपात आणले होते. पकडले जाऊ नये म्हणून ते प्रायव्हेट पार्टमध्ये लपवले होते.
या तस्करीत आणखी कुणाचा सहभाग आहे हे शोधण्यासाठी याबाबत पुढील तपास सुरू आहे. सोन्याच्या तस्करीमध्ये सामील असलेल्या आरोपींना यापूर्वीही विमानतळावर अनेक वेळा अटक करण्यात आली आहे. डीआरआय आणि पोलिसांची पथके या सर्व प्रकरणांचा तपास करत आहेत.



























































