अल्पवयीन मुलीला देहविक्रय करण्यास केले प्रवृत्त, पाच जणांना अटक

789

अल्पवयीन मुलीचा विवाह करून तिला देहविक्रय करण्यास प्रवृत्त केल्याची घटना मानखुर्द परिसरात घडली. मानखुर्द पोलिसांनी मुलीच्या आई व भावासह पाच जणांना अटक केली. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.

पीडित मुलगी ही मानखुर्द परिसरात राहते. ती अल्पवयीन असताना गेल्या वर्षी तिच्या आईने तिचे एकासोबत लग्न लावले होते. लग्नानंतर त्याने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. त्या छळाला कंटाळून मुलगी घरी निघून आली होती. त्यानंतर तिच्या आईने तिला देहविक्रय करण्यास प्रवृत्त केले. पीडित मुलीला मानखुर्द परिसरात राहणाऱया एका महिलेच्या स्वाधीन केले. तिने मुलीला देहविक्रयसाठी चेंबूर येथे एका वृद्ध व्यक्तीकडे तिला पाठवले. त्याने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. पीडित मुलीसोबत लग्न झालेल्या तरुणाने देखील लैंगिक अत्याचार केला होता. या संपूर्ण प्रकाराची माहिती एका दक्ष नागरिकाकडून मिळताच पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवून घेत कारवाई केली.

आपली प्रतिक्रिया द्या