
सामना ऑनलाईन । रायपूर
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडमध्ये तब्बल पाच कोटी रुपयांची रोकड आणि दारू जप्त करण्यात आली आहे. 10 मार्चपासून आचारसंहिता सुरू झाली. त्यानंतर पोलीस, आयकर तसेच कस्टम अधिकारी सक्रिय झाले. निवडणुकीतील प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवण्यात आली होती. बेमेतेरा जिह्यात आणि रायगडमध्ये दागिने आणि मोठय़ा प्रमाणावर रोकड तसेच दारू जप्त करण्यात आल्याची माहिती निवडणुक अधिकाऱ्यांनी दिली.




























































