मालवणात अडीच हजार घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना । मालवण 

‘पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात सोमवारी पाच दिवसाच्या गणपती बाप्पां बरोबर गौराईंनाही भक्तिमय वातावरणात मालवणमध्ये निरोप देण्यात आला. दुपारी चार वाजल्यापासून गणेशमूर्ती विसर्जनास सुरुवात झाली. विसर्जनाच्या ठिकाणी नगर पालिका प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाने सुलभ मूर्ती विसर्जनसाठी सुविधा दिल्या होत्या. तर पोलीस प्रशासनानेही सर्वच विसर्जन मार्ग व किनारपट्टीवर बंदोबस्त ठेवला होता.

समुद्र किनारे, नदी, तलाव, वहाळ, गणेशघाट आदी ठिकाणी प्रथेप्रमाणे बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन ठिकाणी विसर्जन सोहळा पाहण्यासाठीही भाविकांची गर्दी ठिकठिकाणी दिसून येत होती. डीजेच्या झणझनाटावर निर्बंध असल्याने डीजेची हौस बॅंजोसह अन्य वाद्यांनी मिरवणुका निघाल्या होत्या. सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी दिसून आली.

अडीच हजार घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन 

यावर्षी गौरी विसर्जनही पाचव्याच दिवशी आल्याने पाच दिवसांच्या व गौरी गणपती अश्या घरगुती बाप्पांचे मोठया संख्येने बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.  सुमारे अडीच हजार पेक्षा अधिक बाप्पांचे विसर्जन भक्तीमय वातावरणात करण्यात आले. अनेक ठिकाणी अकरा दिवस व अनंत चतुर्दशी दिवशीही मोठ्या संख्येने बाप्पांचे विसर्जन होते. यावर्षी अकरा दिवस व अनंत चतुर्दशी एकत्र आल्याने त्या दिवशीही हजरो गणपतीचे विसर्जन होणार आहे.