मुंबईतील पाच हॉस्पिटल्स ‘कोरोना रुग्णालय घोषित! या रुग्णालयांचा समावेश

1798

कोरोना पॉझिटिव्ह आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व इतर आजार असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी पाच हॉस्पिटल्स पालिकेने ‘कोरोना रुग्णालय’ म्हणून घोषित केली आहेत.

यामध्ये कस्तुरबा, सेव्हन हिल्स, सेंट जॉर्ज, नानावटी आणि सैफी रुग्णालयाचा समावेश आहे. याच रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण ठेवण्यात येतील. तर इतर रुग्णालयांमध्ये क्वारेंटाईन, देखरेख सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये क्वारंटाईन आणि 60 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या कोरोना संशयितांवर देखरेख ठेवण्यात येणार आहेत. पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी याबाबत परिपत्रक जारी केले असून संबंधित यंत्रणेला अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.

क्वारंटाईन आणि देखरेख ठेवण्यासाठी सात रुग्णालये निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये मेटरनिटी होम एसटीडी क्लिनिक बिल्डिंग नागपाडा, मेटरनिटी होम बिहायडिंग लीलावती हॉस्पिटल, पीडब्लूडी गेस्ट हाऊस अंधेरी पश्चिम, डायगनिस्टिक सेंटर पंजाब गल्ली, एमएमसीआर पवई, अर्बन हेल्थ सेंटर शिवाजी नगर, महात्मा गांधी हॉल एस. व्ही. रोड वांद्रे पश्चिम यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या