
उलवे येथील जावळे गावातील एकाच कुटुंबातील पाच जण घरात अत्यवस्थ अवस्थेत सापडल्याची घटना घडली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्वांना रुग्णालयात दाखल केले. परंतू त्यातील संतोष लुहार (२२) याचा मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास पोलीस करीत आहेत.
जावळे येथील सेक्टर-५ मध्ये रमेश लुहार (२७) त्यांची पत्नी बसंती लुहार (२५), धाकटा भाऊ संतोषकुमार आणि मुलगा आयुष, आर्यन असे पाच जण वास्तव्यास आहेत. दरवाजा उघडत नसल्याने शेजाऱ्यांनी आज दुपारी पोलिसांना माहिती दिली. या घटनेची गंभीरपणे दखल घेऊन आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यानंतर पाचही सदस्य अत्यवस्थ स्थितीत आढळून आले. त्यांना तत्काळ पनवेलच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Maharashtra | Five members of the same family were found unconscious in their home in Javle village of Navi Mumbai. When police arrived at the scene after one of the neighbours called them. The police opened the door and found all five members unconscious. They were rushed to the…
— ANI (@ANI) October 23, 2025


























































