परभणीत कॉपी करणाऱ्या पाच विद्यार्थांना पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Exams
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । परभणी

परीक्षा विभागाने कॉपीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात 56 बैठ्या तर 9 भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. या भरारी पथकाने पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला कॉपी करताना 5 परिक्षार्थींना रंगेहाथ पकडले आहे. यात सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचा एक विद्यार्थी आणि मानवत तालुक्यातील रत्नापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या 4 विद्यार्थांना कॉपी करताना पकडले आहे. 56 केंद्रांवर एकूण 24 हजार 268 पैकी 23 हजार 468 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेला सुमारे 800 विद्यार्थी अनुपस्थित होते. उपस्थितीचे प्रमाण 96.70 टक्के आहे. विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये, यासाठी परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.