जम्मू कश्मीरमध्ये पाच संशयित दहशतवाद्यांना अटक

460

जम्मू कश्मीरच्या बारामुला जिल्ह्यात पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त कारवाईत पाच संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांना सोपोर जिल्ह्यातील लोकांना धमकी देण्याच्या आरोपावरून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडून लश्करच्या धमकी देणारे पोस्टरही सापडले आहेत.

कश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी तीन जणांवर सोपोर जिल्ह्यात नागरिकांना धमकी देण्याबद्दल अकट करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दहशतवादी संघटना लश्कर ए तैय्यबाचे पोस्टरही सापडलेआहेत. या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच पैकी दोन दहशतवाद्यांना कुपवाडातून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दारू गोळा जप्त करण्यात आला आहे. हे दोघे आधी अटक केलेल्या तीन दहशवाद्यांशी संबंधि असल्याचे निष्पण्ण झाले. सर्व दहशतवादी लश्कर ए तैय्यबासाठी काम करत असून सर्वांविरोधात गुन्हा दाख करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या