कश्मीरात पाच दहशतवाद्यांचा खात्मा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमध्ये कुलगाम जिह्यात केल्लेम गावात सुरक्षा दलाच्या जवानांनी आज आठ तासांच्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनच्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला.लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांनी दहशतवाद्यांच्या अड्डय़ास वेढा दिल्यानंतर दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत पाच दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा करून ऑपरेशन ऑल आऊट मोहीम यशस्वी केली.