
ठाण्याचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या परंपरेनुसार स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने चंदनवाडी शाखेत शुक्रवारी मध्यरात्री झेंडावंदन करून हिंदुस्थानचा ८०वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आता. भारत माता की जय, वंदे मातरम् अशा गगनभेदी घोषणा देऊन शिवसैनिकांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली आणि माजी सैनिकांचा सन्मान केला. या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे आयोजन शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.
शिवसेना दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री १२ वाजता झेंडावंदन करण्याची परंपरा ठाण्यात सुरू केल्यानंतर या ध्वजारोहण सोहळ्यास ठाणेकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून दरवर्षी १४ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास ध्वजारोहण करण्यात येते. शुक्रवारी मध्यरात्री आयोजित करण्यात आलेल्या या ध्वजारोहण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने आजी, माजी सैनिक, वीरमाता आणि वीरपत्नी उपस्थित होते.
शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते सुभेदार लक्ष्मण महाडिक, हवालदार मंगेश उतेकर, हवालदार प्रकाश पवार, हवालदार प्रदीप पहाडे, दिलीप मोरे, नायक विठोबा पाटील, बळीराम कदम (नारायण), बळीराम सीताराम कदम, वीरपत्नी गीता पंडीत, नाईक सचिन जाधव, सार्जंट शहाबुद्दीन शेख, हवालदार दिलीप सावंत, नाईक संतोष मोरे वीरपत्नी स्वाती वाडेकर, वीरपत्नी शोभा गरंडे, नायक राजेंद्र घरत, शिपाई कल्पेश मांढरे, हवालदार जगदीश पाटील, हवालदार संजय वाडेकर, हवालदार जयराम मोरे, सीएफएन फुलसिंग, कमांडो अजित जाधव, कॅप्टन शंकर कदम, राजू पाटील, हवालदार धनसिंग अहिरे, हवालदार शांताराम कदम, नायक जयदीप भोईर, सुभेदार मनोज हरिभाऊ पाटे, हवालदार एस. म्हात्रे यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, नवी मुंबई जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, मीरा-भाईंदर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख महेश कदम, विधानसभा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, नगरसेवक शहाजी खुस्पे, धर्मराज्य पक्ष अध्यक्ष राजन राजे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, माजी नगरसेविका, संपर्क संघटक नंदिनी विचारे, आकांक्षा राणे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना आझादनगर शाखेत शनिवारी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या शाखेत स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाची परंपरा दिवंगत उपनेते अनंत तरे यांनी सुरू केली होती. माजी नगरसेवक, ठाणे शहर समन्वयक संजय तरे, माजी नगरसेविका उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले. सोहळ्याला उपविभागप्रमुख सत्यवान कदम, विभाग संघटक वैशाली मोरे, अनुराधा चव्हाण, शाखाप्रमुख सागर माने, नंदू गिरी, जगदाळे मास्तर, मनोहर बच्छाव, सारिका राऊत, सुनीता उतेकर, रूपाली जाधव, अरुणा आरडे, बाबू देशमुख, उषा भट, स्मिता सकपाळ, राजू पवार, जितेंद्र राणे, संतोष गवई, इंद्रजीत चौहान आदी उपस्थित होते.























































