
कुमार सानु, अभिजीत भट्टाचार्य, अलका याग्निक आणि ललित पंडित यांच्या मधूर स्वरांनी परिपूर्ण नवीन गाण्यांसह ललित पंडित यांनी संगीत क्षेत्रातील अविस्मरणीय काळातील सोनेरी गीत परत आपल्या भेटीस आणले आहे. ही रोमँटिक गाणी टीव्हीएफ आणि एमएक्स प्लेयरवरील फ्लेम्सच्या दुसर्या सीझनच्या कथेचा भाग आहेत. योगायोगाने फ्लेम्सच्या पहिल्या सीझनमध्ये जतिन-ललित यांच्या ‘पेहला नशा’, ‘ये वादा रहा’ यांसारख्या सदाबहार गाण्यांचा समावेश होता.
‘फ्लेम्स’ या वेब सिरीजचे निर्माते, जतिन-ललित यांच्या संगीताची आवड असणारे तरुण आहेत. या सिरीजच्या दुसऱ्या सिजनसाठी 90च्या काळातील संगीतातील अमरत्व कायम ठेवत मी ही नवीन गाणी तयार करावीत व ती कुमार सानू, अलका याज्ञिक आणि अभिजीत भट्टाचार्य यांसारख्या दिग्गजांच्या स्वरात असावीत अशी त्यांची ईच्छा होती, असे ललित पंडित यांनी सांगितले.





























































