फ्लेमिंगोचे वसईत आगमन, पक्षी प्रेमींना पर्वणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वसई

वसईच्या समुद्र कनारी परदेशी पाहुणे म्हणजे फ्लेमिंगोचे पक्षांचे आगमन झाले आहे. त्यामुळे या फ्लेमिंगोंना पाहण्यासाठी वसईकरांची मोठी गर्दी होताना बघायला मिळत आहे.

चाऱ्याच्या शोधात दर वर्षी श्रावण महिन्यात वसई परिसरात हे पक्षी येतात. मात्र यंदा तब्बल तीन वर्षांनी हे फेलेमिंगो आले असल्याची माहिती पक्षी अभ्यासकांनी दिली आहे. वसई परिसर हा नैसर्गीक सौंदर्याने नटलेला आहे, तसेच येथे समुद्र किनारा, मिठगरे मोठ्याप्रमाणात असल्याने फ्लेमिंगोना हवा असलेला चारा येथे सहज उपलब्ध होतो, त्यामुळे चाऱ्याच्या शोधात वसई परिसरात फ्लेमिंगो येत असतात.