मतदार राजा जागा हो!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संघटनांकडून मतदान जनजागृती जोरदार सुरू आहे. निवडणूक आयोगाने मुंबईकरांना मतदानाच्या दिवशी घराबाहेर काढण्यासाठी कंबर कसली असून मुंबई जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या वतीने एनसीपीए येथे प्लॅश मॉबचे आयोजन करण्यात आले होते. सामूहिक नृत्यातून यावेळी मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात आला. शिस्तबद्ध पद्धतीने एकसुरात ठेका धरत तरुणांनी बहारदार नृत्य करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.