दहीहंडीसाठी आला अन् तुरुंगात गेला, तेरा वर्षांपासून होता फरार

1281

13 वर्षांपासून पोलिसांना चकवा देणाऱया आरोपीला अखेर डोंगरी पोलिसांनी अटक केली. वसंता जगला पवार असे त्याचे नाव आहे. तो दहीहंडीसाठी कर्नाटक येथून मुंबईत आला होता.

2006मध्ये वसंताविरोधात डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याच्या अटकेकरिता डोंगरी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली होती. वसंता हा दहीहंडी पाहण्यासाठी मुंबईत येणार असल्याची माहिती डोंगरी पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर सहायक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अनिल भागडीकर यांच्या पथकातील राठोड, कांबळे, कोरडे यांनी डोंगरी परिसरात सापळा रचला. पोलिसांनी सापळा रचून वसंताला ताब्यात घेतले. तेरा वर्षांनंतर आपल्याला कोणीही ओळखणार नाही असे त्याला वाटले होते. मुंबईतून पळून गेल्यावर तो कर्नाटकच्या विजापूर येथे राहत होता.

आपली प्रतिक्रिया द्या