
आगामी काही काळातच सर्व प्रकारच्या वाहनांच्या इंजिनामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. येत्या सहा महिन्यात प्रत्येक वाहनाला ‘फ्लेक्स फ्यूएल इंजिन’ अनिवार्य करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जीच्या ‘ग्रीन एनर्जी अवॉर्ड’च्या कार्यक्रमात ते बोलत होते. इथेनॉल हे सर्वाधिक परवडणारे इंधन असून इंथेनॉल हे विमानातील इंधनासाठीही यशस्वी झाले आहे. एकापेक्षा अधिक इंधनावर चालणारे फेक्स इंजिन आहे. वाहन निर्मिती करणाऱया कंपन्यांना फ।sक्स इंजिन बनविणे अनिवार्य करण्यात येणार आहे. येत्या 6 ते 8 महिन्यात असे आदेश शासन जारी करणार असल्याचेही ना. गडकरी म्हणाले. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता पर्यायी इंधनाची गरज असून इथेनॉल, सीएनजी, बायो एलएनजी, इलेक्ट्रिक हे पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहे. या इंधनावर सर्वांना जावेच लागणार आहे. सरकारही या दिशेने काम करीत आहे. पेट्रोल डिझेलची 80 टक्के आयात संपवून ती शून्य टक्क्यावर न्यायची आहे, असे गडकरी म्हणाले.

































































