
14 ऑगस्ट रोजी दुपारी मंगळुरू येथून मुंबईकडे निघाणारे विमान अचानक थांबवण्यात आलं. त्यानंतर विमानाचं उड्डाण रोखून सर्व प्रवाशांना बाहेर काढून विमानाची तपासणी करण्यात आली. यामुळे विमान तब्बल सहा तास उशिरानं उडालं. यामागचं कारण ऐकून तुम्ही चकीत व्हाल.
सर्व प्रवाशांना विमानातून उतरण्यास सांगितल्यानंतर मंगळुरू-मुंबई उड्डाणाला सहा तास उशीर झाला.
एका प्रवाशाने सह प्रवासी असलेल्या एका तरुणाच्या मोबाइलमध्ये डोकावलं. तेव्हा चॅटिंगवर एक संशयास्पद संदेश त्याला दिसला. त्याने ही बाब केबिन क्रूच्या निदर्शनास आणून दिली. ताबडतोब, विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आणि विमानीची तपासणी करण्यात आली.
मुलगी बेंगळुरूला जाण्यासाठी तिच्या विमनाची वाट पाहत होती तर मुलगा मुंबईला जाण्यासाठी तयार होता. दोघेही मित्र-मैत्रिण होते आणि ते फक्त गंमत म्हणून सुरक्षेबद्दल बोलत होते. 14B वर बसलेल्या एका प्रवाशाने 13A वर बसलेल्या सह प्रवाशाला ‘Ur da Bomber’ असा मेसज आल्याचे पाहिले.
मीडियाला माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ‘दोघं व्हॉट्सअॅपवर चॅट करत होते आणि तिसर्या एका व्यक्तीने मेसेज पाहिला होता जिथे त्याला काही संशयास्पद असल्याचं जाणवलं. ज्यामुळे घबराट निर्माण झाली. मंगळुरूहून मुंबईला जाणारे इंडिगोचे विमान रखडले. त्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कित्येक तास चाललेल्या चौकशीनंतर त्या व्यक्तीला विमानामध्ये चढण्याची परवानगी देण्यात आली नाही, तर त्याच्या मैत्रिणीची बेंगळुरूला जाणारी फ्लाइट चुकली.
कसून तपासणी केल्यानंतर सर्व प्रवाशांना मुंबईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बसवण्यात आले आणि विमान संध्याकाळी 5 वाजता निघाले.



























































