मोठी बातमी – अमेरिकेतील संपूर्ण विमानसेवा ठप्प; उड्डाणं रोखली, प्रवासी खोळंबले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेत दळणवळणासाठी मोठ्या प्रमाणात विमानसेवेचा वापर केला जातो. एव्हिएशन बॉडीमध्ये कॉम्प्युटरमध्ये बिघाड झाल्यामुळे अमेरिकेतील सारी उड्डाण सेवा ठप्प झाली आहे. यामुळे उड्डाणं रोखण्यात आली असून प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

एव्हिएशन बॉडीवर कॉम्प्युटर बिघडल्यानंतर अमेरिकेतील विमानसेवा ठप्प झाली असून अमेरिकेच्या NOTAM (नोटिस टू एअरमेन) प्रणाली 2028Z मध्ये बिघाड झाला आहे.

फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या (FAA) संगणकावर संगणकातील त्रुटी आढळल्याने संपूर्ण युनायटेड स्टेट्समधील उड्डाणे ठप्प झाली.

यूएस एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम कमांड सेंटरने (ATSCC) म्हटले आहे की, बिघाड दुरुस्तीसाठी सध्या टेकनिकल टीम काम करत आहे, मात्र सेवा पुन्हा कधी कार्यान्वित होईल याचा अंदाज अद्याप सांगता येत नाही.