Chandrapur News – वैनगंगेच्या पुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील 8 गावं प्रभावित, बचाव पथकांसह जिल्हा प्रशासन सज्ज

वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील 8 गावं प्रभावित झाली आहेत. त्यामुळे बचाव पथकांसह जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. घसे खुर्द धरणांमधून सध्या मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे याचा फटका चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी तालुक्याला बसलाय. नदीकिनारी असलेली लाडज, पिंपळगाव भोसले, भालेश्वर, चिखलगाव, अरहेर नवरगाव आणि बेलगाव अशी गावं प्रभावित झाली आहेत. सध्या 14 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून गरज पडल्यास आणखीही लोकांना रेस्क्यू केल्या जाऊ शकतात.

वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने होत असून ब्रह्मपुरी तालुक्यातल्या अनेक नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मुडझा-गांगलवाडी आणि गांगलवाडी-आरमोरी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाल्यास तालुक्यात पूर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाची टीम परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.

ब्रम्हपुरीतील शाळांना उद्या सुटी

दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेली संततधार आणि निर्माण झालेली पूरस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या 10 जुलै रोजी ब्रम्हपुरी तालुक्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे.